पुणे दि ११ :- पुणे एक्साईज शुल्क विभागात अधिकारी असल्याचे भासवून बाप-लेकांनी गावात एक्साईज शुल्क विभागात निरीक्षकाचा ड्रेस घालून फिरत एका व्यक्तीची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल बारा लाख रुपयांची फसवणूक केली.आहे हडपसर पोलिसांनी या बाप-लेकांना अटक केली असून पुणे कोर्टाने 15 जून पर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
शुभम नंदेश्वर शहा (वय २८, रा. तरडगाव, जि. सातारा) व वडील नंदेश्वर शहा (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी करण संजय खुटाळे (वय ३०, रा. तुकाईदर्शन रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत.आरोपी शुभम शहा हा पुण्यात रहात होता. गावी जाताना तो अंगावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा गणवेश घालून जायचा. फिर्यादीला त्याने आपण सीमाशुल्क विभागात निरीक्षक असल्याचे सांगितले होते. एकाच गावातील रहिवासी असल्यामुळे फिर्यादीचा देखील त्याच्यावर विश्वास बसला होता.दरम्यान फिर्यादीला मद्यविक्री करण्यासाठी परवाना काढायचा होता. गावातीलच व्यक्ती असल्यामुळे त्याने शुभमशी संपर्क साधला. शुभमनेही परवाना काढून देण्यासाठी सहमती दर्शवली आणि त्यासाठी वेगेवेगळया ठिकाणी रोख व ऑनलाईन स्वरूपात 12 लाख रूपये घेतले. मात्र, वाईन शॉपचे कोणतेही लायसन्स न देता त्यांची फसवूणक केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.
.