पुणे दि १४ : – पुणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे प्रचंड पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.असे पकडण्यात आलेल्या महिला अधिकारी आहे.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, मंजुषा या महापालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून नोकरीस आहेत.
दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
त्यांची पालिकेत टीडीआर प्रकरणं सुरू आहेत.ते प्रकरण महिला अधिकारी यांच्याकडे होते.त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत त्यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.या कारवाईने पालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे महिला अधिकारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. व . शिवाजीनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास श्रीमती ज्योती पाटील , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत .सदरची कारवाई. पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सीमा मेहेंदळे , पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांचे पथकाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .