• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका ,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/06/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १६:- पुणे शहर पोलिस आयुक्त यांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यासोबत त्यांनी पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शिक्षा केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर आयुक्तांनी कारवाई करुन कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे.यामुळे केली वरीष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई दोन निरीक्षकांना अवैध धंद्यांबाबत आणि एका निरीक्षकाला तपास व्यवस्थित न केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात आली आहे.व तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दणका दिला आहे. संबंधित दोन अधिकाऱ्यांची एक वर्षे वेतनवाढ रोखण्यात आली असून एका अधिकार्‍याला सक्त ताकीद देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, अशोक कदम आणि अजित लकडे अशी शिक्षा सुनावलेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत.
वानवडी परिसरात डिसेंबर 2020 मध्ये बेटींगप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. त्यानुसार पाच जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यातील आरोपी मनीष अजवानी याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढला असता, वानवडीचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे छापा टाकण्यापूर्वी आरोपीसोबत बोललेल्याचे निष्पन्न झाले.
त्यांचे 13 वेळा फोनवर बोलणे झाल्याचे सीआडीआरमध्ये दिसून आले. त्यामुळे पाटील यांनी केलेले वर्तन बेजबाबदार पणाचे आहे. पोलिस दलाच्या शिस्तीस बाधा आणणाने कृत्य केल्याचा ठपका ठेवत पाटील यांची एक वर्षे पगारवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी 2021 मध्ये जुगार अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. त्याठिकाणी जुगार खेळताना 62 जणांना पकडण्यात आले होते. त्यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश सोनवणे हे त्याठिकाणी गेले. त्यांनी पोलिस ठाण्याची संयुक्त कारवाई दाखवा अथवा जास्त मोठी कारवाई करू नका, असे बोलू लागले. त्यामुळे संबंधित जुगार अड्ड्याची माहिती सोनवणे यांना होती, अशी गोपणीय माहिती वरिष्ठांना मिळाली होती. पण, त्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केली नाही. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोजपणे जुगार खेळला जात होता. हद्दीतील अवैधधंद्याचे उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या असताना देखील वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनाही एक वर्षे पगार वाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.नगर जिल्ह्यातील शेगाव पोलिस ठाण्यात नेमणुकीला असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्याचा तपास व दोषारोपपत्र दाखल करताना निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे त्यांना देखील पोलिस आयुक्तींनी चौकशी करून सक्त ताकीदची शिक्षा सुनावली आहे. पोलिस आयुक्तांनी थेट वरिष्ठ निरीक्षकांना शिक्षा सुनावल्यामुळे दलात खळबळ उडाली आहे.

Previous Post

न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन मिळवून देणारे आरोपी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

वांगदरी येथून सहा बालकामगारांची सुटका

Next Post

वांगदरी येथून सहा बालकामगारांची सुटका

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist