कर्जत दि २५ :- तालुक्यातील राशीन जवळील सॉलिसिटर डेअरीची तीन वेळा जाळपोळ करून ७ लाख रुपयांचे नुकसान करणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.राहुल सत्यवान मोरे रा.खेड ता.कर्जत जि.अहमदनगर असे अटक केलेल्याचे नाव आहे.त्याच्याविरुद्ध नितीन नवनाथ वाघमारे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागत नव्हता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार मारुती काळे, तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, संपत शिंदे यांनी गणेशवाडी येथे घटनास्थळी भेट दिली. त्यानुसार सॉलिसीटर डेअरी या प्लॅन्टची पाहणी केली. सदरची घटना ही स्थानिक रहिवासी असलेल्या कोणीतरी कामगारांनी केल्याबाबत पोलिसांना शंका आली.
त्यावरून पोलीस अधीकारी आणि पोलीस जवान यांनी सदर प्लॅन्टचे आसपास फिरुन गुप्त बातमीदारांना भेटुन सदरची माहीती गोळा केली. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या १४ कामगारांची कसून विचारपूस केली त्यावेळी राहुल सत्यवान मोरे रा.खेड ता. कर्जत जि.अहमदनगर यास काही दिवसापूर्वी कामावरून काढून टाकले होते व घटना घडली त्या दिवशी रात्री मोरे हा प्लॅटजवळ फिरत होता अशी गुप्त माहीती मिळाली. पोलीसांनी खात्री केली की सदरचा गुन्हा हा डॉ. राहुल सत्यवान मोरे रा. खेड ता. कर्जत याने केला आहे.असा प्रकार आरोपीने तीन वेळा करून डेअरी मालकांना आणि पोलिसांना आरोपी गुंगारा देत होता.त्यानुसार राहुल मोरे याच्या राहत्या घरी सापळा लावुन त्याच दिवशी ताब्यात घेवून कर्जत पोलीस स्टेशन येथ आणून त्याची कसून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली केले . त्यावेळी पोलीसांनी त्यास गुन्हा का केला असे विचारले असता त्याने सांगितले की, मी गणेशवाडी येथील सॉलिसीटर डेअरी या प्लॅन्टमध्ये कामास होतो त्यावेळी कामाचे पैसे दिले नाही याचा राग मनात धरुन मी हा गुन्हा केला आहे असे सांगितले.आहे धाडसी कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमारअग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने,पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस हवालदार मारुती काळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, संपत शिंदे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे