कर्जत दि २५:-अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने गावातील मोक्याच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवावे असे मत कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यानी व्यक्त केले आहे.कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सर्व सरपंच,उपसरपंच,सदस्य,पदाधिकारी,ग्रामसेवक यांना पत्रव्यवहार करून आवाहन केले आहे.सर्वच ठिकाणी चोरी,जबरी चोरी,दरोडा तसेच मारामारी महिलांविषयीचे गुन्हे घडत असतात.या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपल्या गावात येणारे सर्व रस्ते व चौक या ठिकाणी चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास गुन्ह्यांना आळा घालता येईल. तसेच गुन्हे घडल्यास आरोपीचा शोध लावण्यास मदत होणार आहे.आपल्या ग्रामपंचायतकडे असलेला निधी सदर कामी वापरू शकता. याबाबत आम्ही गट विकास अधिकारी कर्जत यांना पत्रव्यवहार केला आहे. तरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्राधान्य देऊन योग्य ती कार्यवाही करावी.यावेळी चंद्रशेखर यादव म्हणाले की,गावात ग्रामसुरक्षादल स्थापन करून गावात रात्रीची गस्त वाढवावी तसेच गावात येणारे बाहेरून येणारे विविध फेरीवाले यांच्यावर लक्ष ठेवावे ,कुणी अनोळखी वा संशयित दिसल्यास पोलीस ठाण्यात कळवावे.सर्व गावातील सरपंच, उपसरपंच यांनी आपापल्या गावामध्ये मीटिंग घेऊन कॅमेरे बसविणे कामासाठी आपण ग्रामपंचायत निधी किंवा प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती यांच्याकडून निधी उभा करू शकता.जी ग्रामपंचायत लवकरात लवकर व चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. त्यांचा कर्जत पोलिसांतर्फे गौरव करण्यात येईल असे आवाहन चंद्रशेखर यादव यांनी केले आहे
.श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे