कर्जत दि २५ :- कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात महिलेस चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास कर्जत पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे.सविस्तर वृत्त असे कि,एक महिला तिच्या मुलासोबत श्रीगोंदा येथून भांबोरा येथे तिच्या बहिणीच्या घरी मोटरसायकलवर जात असताना जलालपूर ता.कर्जत गावच्या शिवारात सटवाई वस्तीजवळ रस्त्यात पाऊस सुरु झाल्याने एका बाभळीच्या झाडाखाली आडोशाला थांबले असता त्या ठिकाणी मोटरसायकलवर अज्ञात २० ते २५ वयोगटातील दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील ३० हजार रूपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र झटापट करून ओढून घेउन निघून गेले.ही घटना १८ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासाची चक्रे फिरवून पोलीस ठाण्याचे अधिकारी व जवान यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला.कर्जत पोलिसांना त्या परिसरातील गुन्हेगार व वर्णनावरून आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा राजु रमेश चव्हाण याने केला आहे. त्यानुसार पहाटे सुमारास जलालपूर शिवारात कोंबींग ऑपरेशन राबवून आरोपी राजु रमेश चव्हाण वय २१ वर्ष,रा.जलालपूर,ता. कर्जत यास पकडले असुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.चव्हाण याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अमलदार मारुती काळे हे करीत आहेत.सदरची धडाकेबाज कारवाई ही आण्णासाहेब जाधव उपविभागीय अधिकारी कर्जत,यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने,पोलीस अंमलदार अंकुश ढवळे,पांडुरंग भांडवलकर,श्याम जाधव,सुनिल खैरे, गोवर्धन कदम,गणेश ठोंबरे,सागर म्हेत्रे,चालक शकील बेग यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे