पुणे दि १२ :- महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये आपला दबदबा कायम राखला. त्यांच्या आदिती दांडेकर हिने २१ वषार्खालील रिबन्स प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने ४६.४० गुण नोंदविले. तिची सहकारी किमया कदम हिने ४१ गुणांसह रौप्यपदक पटकाविले. तेलंगणाच्या जी.मेघना रेड्डी हिला ब्राँझपदक मिळाले. तिने ३९.३० गुण नोंदविले.
टेबल व्हॉल्टमध्ये त्रिपुराच्या अस्मिता पॉल हिने सुवर्णपदक नोंदविताना १२.७५० गुणांची नोंद केली. पश्चिम बंगालच्या स्वस्तिस्का गांगुली (१२.६७५ गुण) व पूजा नास्कर (११.६२५ गुण) यांना अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळाले.
मुलांच्या २१ वषार्खालील पॉमेल हॉर्स प्रकारात एरिक डे या महाराष्ट्राच्या खेळाडूने सुवर्णपदक पटकाविले. त्याने ११.७० गुण नोंदविले. दिल्लीचा शिवमकुमार याने ११.५५ गुणांसह रौप्यपदक मिळविले. अग्निवेश पांडे या उत्तरप्रदेशच्या खेळाडूला ब्राँझपदक मिळाले. त्याने ११.४० गुण मिळविले. फ्लोअर एक्झरसाईजमध्ये महाराष्ट्राच्या एरिक डे याने रौप्यपदक मिळविले. त्याने १२.४० गुण नोंदविले. उज्ज्वल नायडू या कर्नाटकच्या खेळाडूने १२.५० गुणांसह सुवर्णपदक मिळविले तर उत्तरप्रदेशच्या अग्निवेश पांडे याने १२.१० गुणांसह ब्राँझपदक पटकाविले.