कर्जत,दि.१२ :- कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना घरफोडीच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यांना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. मुर्गेश गोविंद नायर,वय(४०)रा.नागपूर चाळ,येरवडा पुणे, मोसिन बिलाल सय्यद वय(३२)येरवडा पुणे व दोघे अल्पवयीन मुले असे चौघे जण ताब्यात घेण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्रीच्या वेळी कर्जत पोलीस कोम्बिंग ऑपरेशनच्या तयारीत होते. त्यानुसार कर्जत परिसरातून एक पथक शिंदेवाडी रोडने माहीजळगावकडे जात असताना हॉटेल समृद्धीजवळ रोडवर एक पांढऱ्या रंगाची युवान गाडी क्र. एमएच १२ क्यू.एफ ८८४३ उभी असून तिच्यामध्ये चार इसम संशयितरित्या बसलेले दिसले.पोलीस पथकास याबाबत संशय आल्याने, त्यांची नावे विचारली असता मुर्गेश गोविंद नायर, मोसिन बिलाल सय्यद असे व २ अल्पवयीन मुले मिळुन आल्याने त्यांची गाडीची पांचासमक्ष झडती घेतली.त्यांचे गाडीत घरफोडी करण्यासाठी एक लोखंडी कटावणी, लोखंडी कुकरी, एक मूठ आणि कव्हर असलेला चाकू असे घरफोडी चोरी,जबरी चोरी,करण्याचे साहित्य मिळून आले.
त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन आरोपींना बालकास बालसुधारगृह श्रीरामपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम शेख हे करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक, सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग,आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, किरण साळुंके, पोलीस अंमलदार,पांडुरंग
भांडवलकर,श्याम जाधव,सुनिल खैरे,गोवर्धन कदम,यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे