पुणे, दि. १७ :- औंध येथील नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या कुटंबातील सदस्य व साथीदारांवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सपोआ विश्रामबाग विभाग हे करीत आहे, पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की बेकायदेशीर मार्गाने स्वतःस व इतर साथीदारांस आर्थिक फायदा मिळविण्या साठी पिडीत व्यक्तिस अवैधरीत्या कर्जाची रक्कम परत केलेली असतानाही लाखो रुपये मागून त्यापोटी घर नावावर करण्यासाठी बळजबरीने वकिलाच्या कार्यालयात नेऊन सह्या घेतल्या बाबत खंडणी, अपहरण, धमकी हवेत गोळीबार करून , जिवे मारण्याचा प्रयत्न करून , हिंसाचार करणेची धमकी देवून आणि धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने जमीनीच्या मालकी दस्तऐवज स्टॅम्प पेपर , लिहलेले व कोरे पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या पद्धतींची माहीती मिळाली आहे . त्यामध्ये व्याजाचे व्यवसायातुन लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहीती प्राप्त असुन अशा व्यवहारांतुन मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा संशय आहे .तसेच महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी नामे १ ) नानासाहेब शंकरराव गायकवाड , २ ) नंदा नानासाहेब गायकवाड ऊर्फ भाऊ , ३ ) गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड रा.सर्व एनएसजी हाऊस औंध पुणे , ४ ) सोनाली दिपक गवारे , वय ४० वर्षे , ५ ) दिपक निवृत्ती गवारे , वय ४५ वर्षे , दोघेही रा . १२०४/१६ , गजानन महाराज मंदीर , संभाजी बागेजवळ , शिवाजीनगर , पुणे . , ६ ) राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ रा.सर्वोदय रेसिडेन्सी , ए विंग , फ्लॅट नं .२ , विशालनगर , पिंपळे निलख , पुणे कायम रा.मु.पो.भोकर , ता.श्रीरामपुर ,जि.अहमदनगर पुणे . , ७ ) सचिन गोविंद वाळके , ८ ) संदीप गोविंद वाळके दोघेही रा.विधाते वस्ती औंध पुणे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल असुन दाखल गुन्ह्याचा तपास सपोआ विश्रामबाग विभाग हे करीत असुन , तपासात असे निष्पन्न झाले की , वरील आरोपीतांनी बेकायदेशीर मार्गाने स्वतःस व इतर साथीदारांस आर्थिक फायदा मिळविण्या साठी पिडीत व्यक्तिस अवैधरीत्या व्याजाने पैसे देवून ते वसूल करण्यासाठी रीव्हॉल्व्हरचा वापर करून , हवेत गोळीबार करून , जिवे मारण्याचा प्रयत्न करून , हिंसाचार करणेची धमकी देवून आणि धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने जमीनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज स्टॅम्प पेपर , लिहलेले व कोरे पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या पद्धतींची माहीती मिळाली आहे . त्यामध्ये व्याजाचे व्यवसायातुन लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहीती प्राप्त असुन अशा व्यवहारांतुन मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा संशय आहे . मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ रा . एन.एस.जी हाऊस , औंध , पुणे याचे व त्याचे साथीदारां विरुध्द मागील काही वर्षाचे कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न , खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे , दुखापत करणे , बेकादेशीर जमाव जमविणे , कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे , डांबून ठेवणे , जिवे मारण्याची धमकी देणे , घातक अग्नीशस्त्र बाळगणे , अवैधरीत्या सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत . गुन्हयातील मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व इतर विविध साथीदारांसह गुन्हे केले आहेत .तसेच स्वतःच्या अधिपत्याखाली संघटीत गुन्हेगारी टोळी कुटुंबियांसह निर्माण केली आहे . प्रतिष्ठीत तसेच महत्त्वांच्या व्यक्तींसोबत संबंध प्रस्थापित करुन तसेच गरजु व्यक्तींना बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे देवुन त्यांच्याकडुन बेकायदेशीररित्या मुद्दल व व्याज उकळण्यासाठी किंवा त्यांच्याकडुन जबदरस्तीने दस्तऐवज बनवुन त्यांचे स्थावर वा जंगम मालमत्ता बळकावुन त्यातुन अवैध आर्थिक फायदा करुन घेण्याचा उद्देशाने त्यातून बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे . लोकांच्या घर जमीन , शेतजमीन इतर मिळकत स्वतःच्या व कुटुंबातील साथीदारांच्या नावावर करुन जबरदस्तीने व बनावटरित्या दस्तऐवज तयार करुन त्यांचेकडुन स्वतःचा तसेच त्याचे गुन्हेगारी टोळीतील इतर सदस्यांचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी आपल्या संघटीत टोळीची दहशत निर्माण केली आहे . त्याच्या अशा वागण्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनामध्ये / प्रतिष्ठीत नागरिक व्यवसायिकांच्या मनात भिती निर्माण होवुन भितीपोटी बहुतांश प्रतिष्ठीत नागरिक , व्यवसायिक , सर्वसामान्य नागरिक हे त्यांचेविरुध्द गुन्हेगारी कारवायांबाबत तक्रार देणेस धजावत नाहीत . या अनुषंगाने. पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ , पुणे शहर यांचे मार्फतीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) . ३ ( २ ) .३ ( ४ ) , ३ ( ५ ) चा अंतर्भाव करणेस महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १ ९९९ चे कलम २३ ( १ ) ( अ ) अन्वये अंर्तभाव होणेबाबतची मंजुरी मिळणेकामी प्रस्ताव सादर केला असता.नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) . ३ ( २ ) , ३ ( ४ ) . ३ ( ५ ) चा अंतर्भाव करणेचे आदेश पारीत केलेले आहेत . सदरची कारवाई.पोलीस आयुक्त , पुणे शहर ,अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ.रविंद्र शिसवे , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग ,नामदेव चव्हाण ,पोलीस उपआयुक्त , परिमंडळ ४.पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त , विश्रामबाग विभाग , बजरंग देसाई , समीर चव्हाण , सहाय्यक पोलीस निरीक्षक , चतुःश्रृंगी पोलीस ठाणे , श्रीमती.सुप्रिया पंढरकर , पोलीस उप निरीक्षक , चतुःश्रृंगी पोलीस ठाणे , व पोलीस स्टाफ यांचे पथकाने केली आहे.पोलीस आयुक्त , पुणे शहर. अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ४८ वी कारवाई आहे .