पुणे, दि.१७ :- पुणे शहरातील लक्ष्मी रोड येथील गजबजलेल्या ठिकाणाहुन दुचाकी गाडीची डीक्की उघडुन त्यामधील सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणाऱ्या सराईत चोरटा फरासखाना पोलिसांनी अवघ्या १ तासात शोध घेवुन , अटक केली आहे त्याचेकडुन चोरलेले मंगळसुत्र जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे दि १५ रोजी १८.०० वा ते १९ .३० वा चे चे सुमारास विजयराज लॉजसमोर , बुधवार पेठ , पुणे येथे फिर्यादी नामे ओंकार संजय हाटकर यांनी त्यांच्या पत्नीचे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र दुरुस्त करुन त्यांचे ज्युपीटर गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते व गाडी विजयराज लॉज , बुधवार पेठ , पुणे समोर पार्क केली असता ते त्यांच्या मुलीला कपडे घेण्यासाठी तुळशीबागेत गेले असताना व परत आल्यानंतर त्यांनी ज्युपीटर गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले सोने चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीच्या डिक्कीमधुन मंगळसुत्र चोरुन नेले व त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला व गुन्हा नोंद करण्यात आला आहे . दाखल गुन्हयातील तात्काळ अज्ञात आरोपीचा फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार संदीप कांबळे , समीर माळवदकर , अभिनय चौधरी यांना नमुद गुन्हा हा पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी बाबा लक्ष्मण बनपट्टे , रा . ८८३ वडारवाडी , मारुती मंदीरजवळ , मॉडेल कॉलनी , पुणे शहर याने केला असल्याची माहीती तांत्रिक विश्लेषणाचे आधारावरुन मिळाली . त्यानुसार.राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग हे तपास पथकातील पोलीस स्टाफसह आरोपी बाबा लक्ष्मण बनपट्टे याचा शोध घेत असताना आरोपी बाबा लक्ष्मण बनपट्टे , हा बाटा गल्ली , बुधवार पेठ , पुणे येथे दि १६/०८/२०२१ रोजी मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करुन त्याचेकडुन फिर्यादी यांचे चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र जप्त करुन गुन्हा एक तासामध्ये उघडकीस आणला आहे आरोपीकडुन चोरी केलेले मंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे . सदरचा आरोपी हा पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील सराईत भामटया चोर असुन त्याचेवर यापुर्वी देखील गुन्हे दाखल आहेत . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील हे करीत आहेत . सदरची कारवाई.अभिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त , पुणे शहर , डॉ . रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुकत , पुणे शहर , डॉ.संजय शिंदे ,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर , डॉ . प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ पुणे , सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे , मनोज अभंग सहाय्यक पोलीस निरीक्षक , अजितकुमार पाटील , पोलीस उप निरीक्षक , व पोलीस अंमलदार समीर माळवदकर , संदीप कांबळे , अभिनय चौधरी , सचिन सरपाले , रिजवान जिनेडी , मेहबुब मोकाशी , महावीर वलटे , राकेश क्षीरसागर , रिजवान जिनेडी , ऋषीकेश दिघे , अभिनय चौधरी , वैभव स्वामी , मोहन दळवी , गणेश आटोळे यांच्या पथकाने केली आहे .