पुणे दि १२ :- खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदक जिकले आहे. शनिवारी अखेर एकूण ४१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राचा संघ ११४ पदकांसह आघाडीवर राहिली.व
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण आणि जिम्नॅस्टिकमध्ये घवघवीत यश मिळवित विविध खेळांमध्ये ९ सुवर्ण, ८ रौप्य, ६ कास्यं पदकांसह एकूण २३ पदक जिकले आहे
* तीन हजार मीटर्स धावणेमध्ये पूनमला रौप्य
महाराष्ट्राच्या पूनम सोनुने हिने तीन हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. तिला हे अंतर पार करण्यास १० मिनिटे ११.३३ सेकंद वेळ लागला. उत्तरप्रदेशच्या रेबी पाल हिने ही शर्यत १० मिनिटे ९.८८ सेकंदात जिंकंली. महाराष्ट्राच्या पूर्णा रावराणे हिचे गोळाफेकीतील सुवर्णपदक थोडक्यात हुकले. तिने १४.०७ मीटर्सपर्यंत गोळाफेक केली. उत्तरप्रदेशच्या अनामिका दास हिने १४.१० मीटर्सपर्यंत गोळाफेक करीत सुवर्णपदक जिंकले.आहे
* जिम्नॅस्टिकमध्ये चार सुवर्णपदकांची कमाई
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. आदिती दांडेकर हिने २१ वषार्खालील रिबन्स प्रकारात सुवर्णपदक जिंकले.आहे व तिने ४६.४० गुण नोंदविले. तिची सहकारी किमया कदम हिने ४१ गुणांसह रौप्यपदक पटकाविले.आहे
मुलांच्या २१ वषार्खालील पॉमेल हॉर्स प्रकारात एरिक डे या महाराष्ट्राच्या खेळाडूने सुवर्णपदक पटकाविले आहे.व त्याने ११.७० गुण नोंदविले. तसेच फ्लोअर एक्झरसाईजमध्ये एरिक याने रौप्यपदक मिळविले. त्याने १२.४० गुण नोंदविले. वैदेही देऊळकर हिने महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घालताना असमांतर बार या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने ९.१५ गुण नोंदविले. रोमन रिंग्ज प्रकारात ओंकार शिंदे याने १२.०५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले आहे
* जलतरणात महाराष्ट्राचा सुवर्णचौकार
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणामध्ये पदकांची लयलूट कायम राखताना शनिवारी चार सुवर्ण व तीन रौप्यपदके जिंकली. महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिस हिने १७ वषार्खालील गटात चारशे मीटर्स मिडले शर्यत ५ मिनिटे २३.३६ सेकंदात जिंकली. या शर्यतीत महाराष्ट्राच्या सिया बिजलानी हिचे ब्राँझपदक थोडक्यात हुकले. याच वयोगटात महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता हिने १०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर ५९.७८ सेकंदात पार केले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या साध्वी धुरी हिने शंभर मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यासाठी एक मिनिट १.०२ सेकंद वेळ लागला. पंधराशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋतुजा तळेगावकर हिने रौप्यपदक पटकाविले. तिने हे अंतर १८ मिनिटे ५३.३६ सेकंदात पूर्ण केले. तामिळनाडूच्या भाविका दुगर हिने ही शर्यत १८ मिनिटे १३.०७ सेकंदात पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्राला शनिवारी चौथे सुवर्णपदक मिहिर आंम्ब्रे याने जिंकले. त्याने २१ वषार्खालील गटात शंभर मीटर्स बटरफ्लाय शर्यत ५६.१० सेकंद वेळ लागला. याच वयोगटातील ४०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याला रौप्यपदक मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास ४ मिनिटे १०.७५ सेकंद वेळ लागला. कर्नाटकच्या कुशाग्र रावत याने ही शर्यत चार मिनिटे ०१.८३ सेकंदात जिंकली. या वयोगटातील चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे अंतर चार मिनिटे ०१.७० सेकंदात पूर्ण केले. कर्नाटकच्या खेळांडूंनी ही शर्यत तीन मिनिटे ५६.३८ सेकंदात जिंकली.
* कुस्तीमध्ये चार कास्यंपदकांची कमाई
महाराष्ट्राच्या मल्लांना कुस्तीमधील २१ वषार्खालील गटात केवळ चार कास्यंपदकांवर समाधान मानावे लागले. फ्रीस्टाईल विभागाच्या या स्पर्धेतील ५७ किलो गटात ज्योतिबा अटकाळे याला कास्यंपदक मिळाले. ६५ किलो गटात देवानंद पवार याला कास्यपदकाची कमाई झाली. ९७ किलो गटात विक्रम पारखी याने ब्राँझपदक पटकाविले. ७१ किलो गटात सागर शिंदे यालाही ब्राँझपदक मिळाले.
* नेमबाजीत हर्षवर्धन यादवला कास्यं ; ज्युदोमध्ये १ रौप्य व १ कास्यंपदकाची कमाई
नेमबाजीत हर्षवर्धन यादव याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुलमध्ये कास्यंपदक पटकाविले. ज्युदोमध्ये मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या निशांत गुरव याला रौप्यपदक मिळाले. ७३ किलो गटात राजस्थानच्या हेमांत जैस्वाल याने अंतिम फेरीत निशांतला पराभूत केले. २१ वर्षाखालील मुलींच्या ४८ किलो गटात महाराष्ट्राच्या विद्या लोहार हिला कास्यंपदक मिळाले.
* केंद्रीय क्रीडामंत्र्यांचा मुलगा मानवादित्यसिंह राठोड याला नेमबाजीत सुवर्ण
विविध खेळांमध्ये आॅलिंपिक स्पर्धेत स्थान मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी खेलो इंडिया हे उत्तम व्यासपीठ आहे, असे आंतरराष्ट्रीय नेमबाज मानवादित्यसिंह राठोड याने सांगितले.
मानवादित्य हा केंद्रीय क्रीडा मंत्री व आॅलिंपिक रौप्यपदक विजेते नेमबाज राजवर्धनसिंह राठोड यांचा मुलगा आहे. त्याने येथे शनिवारी झालेल्या २१ वषार्खालील ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
स्पर्धेबाबत मानवादित्य म्हणाला, येथे विजेतेपदाची मला खात्री होती. ही स्पर्धा २०२० मध्ये टोकियो येथे होणाºया आॅलिंपिक क्रीडा स्पधेर्साठी निवड चाचणी मानली जाते. त्यामुळेच या महोत्सवात सर्वच खेळांमध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. साहजिकच या स्पर्धेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आॅलिंपिक पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी यंदा विविध जागतिक मालिकांमध्ये चांगले यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे.