पिंपरी चिंचवड, दि.१८ :-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर आज (बुधवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापा टाकला.
त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.. व 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुण्याच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली असून स्टॅंडीग कमीटी चेअरमन – नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे अॅन्टी करप्शनने 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 9 लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. अॅन्टी करप्शनचे पथक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. व
अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. 9 लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. 2 लाख रूपये पीए मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्टँडींग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, मनपा मधील लिपीक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती अॅन्टी करप्शनकडून देण्यात आली आहे.
स्टॅंडीग कमीटी चेअरमन – नितीन ज्ञानेश्वर लांडगे
PA – ज्ञानेश्वर पिंगळे
क्लार्क = अरविंद कांबळे
राजेंद्र शिंदे
मागणी – नऊ लाख
स्विकारले – दोन लाख( PA)
टेंडर मंजुर झाले , वर्क ऑर्डर काढणे करीता,