पुणे, दि.२० :- पक्षातील मरगळ झटकण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण करण्याकरिता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आनंद घेऊन सर्वांना सुखद धक्का दिला आहे. दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून कार्यकर्ते सुधीर काळे यांच्या घरी जेवण करत नानांनी आपला साधेपणाचा प्रत्यय करुन दिला. यावेळी पटोले यांनी काळे यांच्या घरच्यांची विचारपुस करत स्नेह वृदिंगत केला तसेच इतर कार्यकर्यांना भेटत त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा आढावा घेतला.स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे दौ-यावर आहेत. कॉंग्रेसची साधेपणाची परंपरा यानिमित्ताने प्रदेशाध्यक्षांकडून जोपासली जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पहायला मिळत असल्याची भावना पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी व्यक्त केली.