पुणे दि.२०:- कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांमार्फत मोफत अन्नधान्याचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळविले आहे.कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजने अंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थीसाठी शासनाकडील पत्र दिनांक २७ एप्रिल २०२१ अन्वये माहे मे २०२१ व जून २०२१ करिता तसेच शासनाकडील पत्र दिनांक २९ जून २०२१ अन्वये माहे जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२१ करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत (NFSA) अनुज्ञेय असलेल्या (नियमित) अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति माह ५ किलो अन्नधान्य (३ किलो गहू व २ किलो तांदूळ) मोफत वितरीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकेतील नोंदी नुसार प्रत्यक्ष असलेल्या सदस्यांना नियमित धान्यासह अतिरिक्त प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य (३ किलो गहू व २ किलो तांदूळ) या परिमाणात माहे मे २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीकरीता पुणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांमार्फत मोफत वितरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे. याची पात्र शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.