श्रीगोंदा,दि.२३ :-श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय घारगाव येथील कृषीदुत प्रसाद भाऊसाहेब उंडे याने ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम दौऱ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक तण,बोर्डो पेस्टचा वापर,कीड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर जसे अवजारांचा वापर शेतीचे आर्थिक नियोजन जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच विविध विषयांचे प्रात्यक्षिके आयोजित करून आधुनिक तंत्रज्ञाना विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी आधुनिक शेती करताना कृषी मोबाईल अॅपचा वापर शेतकऱ्यांनी करुण नवीन तंत्रज्ञानाचा शेतीत उपयोग करावा असे त्याने सांगितले. यावेळी मढेवडगांव येथील महिला शेतकरी सरस्वती भोंग,अंबादास भोंग, तुकाराम भोंग,राहुल खेडकर आदी शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एच. निंबाळकर कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एच. साळुंके कार्यक्रम समन्वयक ऑफिसर. बंडगर एस. एस., वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख. कार्यक्रम अधिकारी ए.ए.शिंदे,प्रोफेसर नवसुपे सर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे