श्रीगोंदा,दि.२४ :- कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत. ग्रामीण जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव येथील कृषीदूत मांडे प्रवीण दिलीप हा सध्या गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. माती परीक्षणाचे फायदे, निंबोळी अर्क निर्मिती, बीजप्रक्रिया, पशुखाद्य प्रक्रिया, बोर्डो पेस्टचा वापर, कीडनाशकांची फवारणीवेळी घ्यावयाची काळजी, तण व्यवस्थापन आदी विषयांबाबत त्याने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.यासोबतच बिज प्रक्रियेच्या पद्धती त्यासाठी वापरण्यात येणारे विविध रासायनिक आणि जिवाणू संवर्धक याबाबत याबद्दल उपस्थित ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एच. निंबाळकर कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एच. साळुंके कार्यक्रम समन्वयक ऑफिसर. बंडगर एस. एस., वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख. प्रोफेसर नवसुपे सर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे