श्रीगोंदा,दि.०१ :- जनावर चोरी करणाऱ्या तीन जणांना श्रीगोंदा पोलिसांनी गजाआड केले असून,वाहनासह २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शायबाज अन्सार शेख रा.चिंचोली रमजान ता.कर्जत,रियाज हमीद शेख रा.रमजान चिंचोली ता.कर्जत,शोयब सलीम कुरेशी रा.सिध्दार्थनगर ता.कर्जत अशी या गजाआड केलेल्या जनावर चोरांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,तानाजी गुलाबगिरी गोसावी रा. रुईखेल ता.श्रीगोंदा यांच्या शेतातील गोठ्यातून २० हजार रुपये किमतीची जर्सी गाय चोरीला गेल्याची २५ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार स.पो.नि दिलीप तेजनकर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली कि,शायबाज अन्सार शेख याने त्याच्या आणखी दोन साथीदारासोबत जनावर चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार शायबाज शेख याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.यानंतर पोलिसांनी त्याचे दोन साथीदारांना ताब्यात घेऊन गजाआड केले.तसेच गुन्ह्यात वापरलेला एक छोटा हत्ती मालवाहु गाडी नं. एम. एच.१४ सी.पी. ८५२२ ही जप्त केली आहे.गुन्ह्यातील चोरीस गेलेली गाय ही शोयब सलीम कुरेशी यास विकली असुन ती पुढे त्याने आळेफाटा येथील बाजारात १० हजार रुपयांना विकल्याची कबूल केले असून आरोपींकडुन १० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. गुन्ह्यातील इतर फरार आरोपी अटक झाल्यानंतर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा तपास स.फौ.भानुदास नवले हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप तेजनकर, स.फौ. अंकुश ढवळे, पो.ना गोकुळ इंगवले, पो.कॉ प्रकाश मांडगे, पो.कॉ किरण बोराडे, पो.कॉ.दादासाहेब टाके, पो.कॉ अमोल कोतकर, पो.कॉ प्रकाश दंदाडे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे