श्रीगोंदा,दि.१०:-कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील लसीकरण मोहीम देखील थंडावली होती. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचं लक्षात घेऊन बेलवंडी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र बेलवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात विक्रमी ९३४० कोवीड लसींचे लसीकरण पार पडले.यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यामध्ये प्रथम व द्वितीय दोन्ही डोसेस च्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करून शिस्तबध्दरित्या लसीकरण पार पडले.यावेळी बेलवंडी गावच्या सरपंच प्रा. डॉ. सुप्रिया संग्राम पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संग्राम पवार, उपसरपंच उत्तम भाऊ डाके, ग्रा.पं. सदस्य संदिप आरकस, सलीम भाई शेख, डॉ.अशोक शेलार, मधुकर काळाणे, भास्कर घोडेकर, संदिप तरटे, बाळासाहेब ढवळे, अरुण काळाने, उषा पवार भिमराव लबडे, गणेश भुजबळ, पंडीत पुराणे, अजित भोसले, संभाजी बेहरे, महादु काका हिरवे, अशोक शिंदे, पोलीस पाटील मधुकर शेलार प्रा.आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.मुळे, सिनकर,ग्रा.पं. चे ग्रामविकास अधिकारी साबळे भाऊसाहेब,अधिक्षक राजु भाई हवालदार, ग्रा.पं कर्मचारी रहिम हवालदार, श्रीकांत साळुंखे,अर्जुन पवार, पपू येडे, राजु बन्सी हवालदार, सचिन पवार, आदेश लोखंडे, अशपाक मुलानी, विजय घोरपडे आदींचे लसीकरणासाठी मोलाचे सहकार्य लाभले. काही ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेवून नियोजन करण्यास मदत केली यामध्ये लाटे मेजर, गणेश लाढाणे यांनी सहकार्य केले.
लसीकरणा दरम्यान श्रीगोंदा तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी भेट दिली. लसीकरण अत्यंत शिस्तबध्दरीत्या चालु असलेचे पाहून त्यांनी सहकार्याबद्दल सरपंच यांचे आभार मानले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे