श्रीगोंदा,दि.१०:- महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची परंपरा आहे. शिवाजी महाराजांसारखे थोर महापुरुषाचा इतिहास या राज्याला आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच त्यांचे कार्यकर्ते शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करतात. पण शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही. त्यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून कृती करणं जास्त आवश्यकता आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगांव येथे एका महिला सरपंचास ग्रामसभेमध्ये बहुमताने तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करण्यात आली असताना गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, “सदरची निवड आम्हास मान्य नाही” असा आरडाओरडा करून महिला सरपंच यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांना मारहाण केली.मारहाण झालेल्या विद्यमान महिला सरपंचाचं नाव राणी मच्छिंद्र कातोरे असे आहे.ही बाब अतिशय निंदनीय असून अशा प्रकारे महिला लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करणेच्या गैरउद्देशाने मारहाण करणे निषेधार्थ आहे.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या महिला धोरणांचा अवलंब करत, महिलांना प्रत्येक क्षेत्रात काम करणेसाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सामाजिक, राजकीय तसेच इतर क्षेत्रातही महिलांसाठी आरक्षणाची भूमिका मांडली गेली.तसेच कायद्यानुसार महिलांवरील अत्याचारांवर अंकुश ठेवण्यासाठी नवनवीन कायदे तसेच जुन्या कायद्यांमध्ये बदल दुरुस्ती करण्यात आले. महिलांचा सामाजिक, राजकीय सहभाग वाढवण्याच्या हेतूने त्यांना आरक्षण देण्यात आले.
अशा प्रकारच्या घटनेमुळे महिला लोकप्रतिनिधींवर काम करताना दबाव निर्माण करण्याच्या गैरहेतूने त्यांच्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला करणे निंदनीय आहे. याचा राष्ट्रवादी पक्षातर्फे निषेध करण्यात आला आहे. तसेच आरोपींवर जास्तीत जास्त कठोर कार्यवाही करावी अशी विनंतीचे निवेदन देण्यात आले.यावेळी मिनलताई भिंताडे, तालुकाध्यक्ष महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस,अॅड. दिपालीताई बोरुडे, तालुकाध्यक्ष युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस,संजय आनंदकर सर,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस,मिरा तुकाराम कातोरे,अंजली प्रविण कातोरे आदीनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे