पुणे, दि.१७ :- पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांना सहकार्य करून उत्सव अतिशय साध्या पद्धतीने. गणेश विसर्जनासाठीही मंडळांसह घरगुती विसर्जन नागरिकांनी शासनाच्या नियमावलीचे पालक करण्याचे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे. त्यानुसार बाप्पांच्या विसर्जनसाठी तब्बल 7 हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामध्ये एसआरपीएफ, सीआरपीएफच्या तुकड्यासह बीडीडीएस, साध्या वेशातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.बाप्पांच्या विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोनाचा आणखीन प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यापार्श्वभूमीवर यंदाही बाप्पांच्या
विसर्जन मिरवणूकीला व कोणत्याही ढोल-ताशा किंवा इतर परवानगी देण्यात आली नाही. त्याशिवाय भाविकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांनी उत्सव मंडपातच बाप्पाचे विसर्जन करावे. त्याशिवाय घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या फिरत्या हौदांसह सोसायटीच्या आवारात करण्याचे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे. दरम्यान, उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला, तरी बाप्पांच्या विसर्जनासाठी पुणे शहरात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा 7 हजारांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजीही घेतली जाणार असल्याचे पुणे शहर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. गणपती विसर्जनासाठी असा आहे पोलिसांचा बंदोबस्तहोमगार्ड – 450, एसआरपीएफ- 4 तुकड्या, दंगल विरोधी 10 पथके, बॉम्ब शोधक व नाशक 8 पथके, शीघ्र कृती दल 16 पथके, सर्व पोलीस ठाण्यातंर्गत 1 हजार 100 कर्मचारी, गुन्हे शाखेतील 200 कर्मचारी, विशेष शाखेतील 100 कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्स 10 पथके, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेची 20 पथके, विशेष पोलीस अधिकारी एसपीओ १ हजार 200.वाहतूक नियमनासाठी एक हजारांवर कर्मचारीगणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल 1 हजारांवर वाहतूक कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः मध्यवर्ती भागातील वाहतूक नियंत्रित करण्यावर प्राधान्य दिले जाणार आहे. मानाचे गणपती आणि शहरातील नावाजलेल्या गणपती मंदीर परिसरातील वाहतूकीसंदर्भात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहतूक कर्मचारी नियमनासाठी तैनात असणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी दिली आहे.पोलिसांसह एसपोओंही रस्त्यावर- सहपोलीस आयुक्त
बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः स्थानिक पोलीस ठाण्यांसह विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) गुन्हे शाखेचाही वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक झोननुसार बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहेत. त्याशिवाय साध्या वेशासह वर्दीतील कर्मचारी राहणार आहेत. त्याबरोबरच घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचाही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार असल्याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यांनी दिली आहे.