पुणे,१८ : -पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाईपदासाठी येत्या ५ ऑक्टोबर २०२१ ला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. भरतीप्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा होत आहे.त्यासाठी २२ सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळणार आहेत.पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या २१४ जागांसाठी २०१९मध्ये जाहिरात दिली होती. यासाठी ३९ हजार ३२३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली होती.. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यातील १२५३८ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जानेवारी महिन्यात पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. पोलीस भरती प्रक्रियेतील बदलांविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा यापूर्वी २०१९ साली पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांविरोधात पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता.कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता या प्रक्रियेला वेग आला आहे.राज्य सरकारच्या निर्णयानुसार पोलिस भरतीत शारीरिक चाचणी अगोदर पहिल्यांदाच लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून खासगी यंत्रणेमार्फत ही परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गुप्ता म्हणाले, ”या परीक्षेसाठी २२ सप्टेंबरपासून उमेदवारांच्या ई-मेलवर आलेल्या लिंकवर प्रवेशपत्र मिळू शकेल. परीक्षेत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी सीसीटीव्ही, बायोमेट्रीक सुविधा, व्हिडिओ चित्रीकरणवर भर दिला जाणार आहे. शहरात विविध भागांत १४३ केंद्रावर ही परीक्षा होईल. त्यात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.”
प्रवेशपत्र मिळण्यास सुरुवात : २२ सप्टेंबर
लेखी परीक्षा : ५ ऑक्टोबर
परीक्षेची वेळ : सकाळी ११ ते दुपारी १२.३०
या भरतीची वैशिष्ट्ये
उमेदवार : ३९ हजार ३२३
परीक्षा केंद्र : १४३
परीक्षा कक्ष : २१९८
एका कक्षातील उमेदवारांची क्षमता : २४
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी…
https#://mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone या लिंकवर युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगइन केल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. तसेच ॲप्लिकेशन आयडी, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख अर्जात भरल्याप्रमाणे टाकूनही प्रवेशपत्र मिळवता येईल.
अडचण आल्यास इथे संपर्क साधा –
मोबाईल क्रमांक : ९६९९७९२२३०/८९९९७८३७२८/९३०९८६८२७०
पोलिस नियंत्रण कक्ष : ०२०- २६१२२८८०, २६१२६२९६