पिंपरी-चिंचवड,दि.20 : -वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींची सुटका करत पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात वेश्या व्यवसायाच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणा-या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाडून अटक करण्यात आली आहे. हा व्यवयाय पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये उघडकीस आला आहे.
नुकतंट या आगोदर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती.
जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली होती.
यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.यांनतर आता पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी धाड टाकली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनुसार, कारवाई करत पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली आहे.तसेच त्यांच्याकडून व्यवसाय करून घेणा-या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे.स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.