पुणे,दि३० :-अली दारुवाला यांना ‘ एचआर एक्सलन्स अॅवार्ड'(बेस्ट वर्क फोर्स प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ) हा पुरस्कार 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता हॉटेल प्राइड येथे होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात आला . अली दारुवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत .मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या इंटलेक्च्युअल सेलचे ते राष्ट्रीय सह संयोजक आहेत .तसेच भाजप प्रवक्ता म्हणून देखील ते कार्यरत आहेत. हा पुरस्कार ‘पुणेकर न्यूज’ यांच्या वतीने,टिकम शेखावत ,पोलीस उपाधीक्षक पंकज देशमुख ,शिवसेनेचे रघुनाथ कुचिक ,पत्रकार नदीम इनामदार यांच्या हस्ते देण्यात आला