श्रीगोंदा,दि ३०:- मढेवडगांव स्मार्टग्राम ग्रामपंचायत आणि पं.स.सदस्य जिजाबापू शिंदे मित्र मंडळ यांच्या वतीने सहकारमहर्षी नागवडे कारखान्याचे माजी व्हॉ.चेअरमन केशवभाऊ मगर यांना सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल “लोकसत्ताचा सहकाररत्न”,आबासाहेब जगताप यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल व चि.वेदांत नंदकुमार पवार याची CET परीक्षेत ९९.६९ अशा उत्तुंग गुणांनी उत्तीर्ण, तसेच प्रियंका भगवान खेडकर हिने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल या सर्वांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक लक्ष्मण मांडे यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक पोपट आबा उंडे हे होते.या कार्यक्रमावेळी सत्कारमूर्ती केशव मगर आपल्या भाषणात बोलताना म्हणाले कि,मी सहकार क्षेत्रात ३०वर्षे झाले काम करतोय त्या कामाची पोहोच पावती म्हणून लोकसत्ताने राज्यस्तरीय “सहकाररत्न” पुरस्कार देऊन उतराई केली.सहकार क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे त्याचे फळ मिळाले.हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून मला गेली 30वर्ष सहकारात काम करण्याची संधी देणाऱ्या सभासदाचा आहे.
त्यानंतर पं.स.सदस्य जिजाबापू शिंदे बोलताना म्हणाले कि,बदल हा निसर्गाचा नियम आहे.सहकार महर्षी नागवडे कारखान्याची निवडणूक उंबरठ्यावर आली असून सर्व सभासदांनी मतदानातून बदल घडवून सत्ता परिवर्तन करावे.सत्ता आल्यानंतर नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उसाला एक नंबरचा भाव देऊ व एफ.आर.पी ची रक्कम एकरकमी देऊ.तसेच पं.समितीच्या माध्यमातून पं.स.गणातील गावामध्ये मदत करू असे आश्वासन यावेळी दिले.यावेळी सत्कारमूर्ती आबासाहेब जगताप,नंदिनीकाकी वाबळे, नंदकुमार पवार,संदीप मांडे, साहेबराव उंडे, वसंत उंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपसरपंच दीपक गाडे,अंबादास मांडे,भगवान धावडे, दत्तात्रय शिंदे,मा.उपसरपंच गणेश मांडे, साहेबराव उंडे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मांडे,गेना मांडे, दत्तात्रय गोरे,अमोल गाढवे,मा.सरपंच पोपट गोरे, राजेंद्र शिंदे,आप्पा भोसले, राजेंद्र उंडे, माणिक मांडे,काळूराम ससाणे,माणिक जाधव आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार अमोल गाढवे यांनी मानले.
चौकट:-सहकार क्षेत्रात कै.शिवाजीराव(बापू)नागवडे यांचे खरे राजकीय वारसदार हे मा.व्हा.चेअरमन केशवभाऊ मगर हेच आहेत.तसेच कारखाना उभारणीत मढेवडगावचे ग्रामभूषण कै.खासेराव (काका) वाबळे यांचाही सिहांचा वाटा असून,सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्यांचेही कारखाना स्थळावर छोटेसे स्मारक उभारावे अशी मागणी माजी व्हाईस चेअरमन केशवभाऊ मगर यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते संदीप विश्वनाथ मांडे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे