• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

3 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला दिल्ली एअरपोर्ट वरून परदेशात पळून जाताना पुणे शहर पोलिसांनी घेतलं ताब्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/11/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०१ :- गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील काही नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.नागरिकांनची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. सोमजी दाम्पत्य हे श्रीलंका मार्गे कॅनडला पळून जाण्याच्या तयारी होते, अशी माहिती समोर आली आहे.अलनेश अकील सोमजी, डिंपल अलनेश सोमजी दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुण्यातील अनेकांना वार्षिक 24 टक्के परतावा (24 देण्याच्या बहाण्याने गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. शुक्रवारी (दि.29 ऑक्टोबर) सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. आज या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले. आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर याची माहिती पुणे शहर पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दिल्ली येथे रवाना झाले आहे. पथकाने कायदेशीर कारवाई करुन दाम्पत्याला ताब्यात घेतले असून त्यांना पुण्यात आणले जात असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण. अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली.

काय आहे प्रकरण ?
योगेश विष्णु दिक्षीत (वय-41 रा. नाना पेठ) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दाखल केली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर दोघांची तब्बल 3 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला एम.जी. एन्टरप्रायजेस या फर्ममध्ये पैसे गुंतवल्यास त्या रकमेवर 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीवर विश्वास ठेवून 45 लाख रुपये गुंतवले. ही रक्कम डिंपल सोमजी यांच्या बँक खात्यावर जमा केले.
फिर्यादी यांनी जमा केलेल्या 45 लाखावर 21 लाख 90 हजार असे एकूण 66 लाख 90 हजार रुपये देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले.
मात्र, आरोपींनी त्यांना परतावा आणि मुद्दल न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.या शिवाय आरोपींनी किरण शेट्टी यांची 57 लाख 33 हजार आणि माया चावला यांची 1 कोटी 22 लाख 25 हजार
रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पैशांची मागणी करुन देखील पैसे मिळत नसल्याने फिर्यादी यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता.
तक्रारीची चौकशी करुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक
दोनचे पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण करीत आहेत.

Previous Post

वोक्हार्ट हॉस्पिटलने पक्षाघात आजाराच्या जागरूकतेसाठी बनवला “नाशिक स्ट्रोक क्लब” पक्षाघातून बरे झालेले रूग्ण सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून करणार जनजागृती…

Next Post

मराठी ‘बाहुबली’ आपल्या भाषेची महत्ता अधोरेखित करणारा – अभिनेते डॉ. अमोल कोल्हे

Next Post

मराठी ‘बाहुबली’ आपल्या भाषेची महत्ता अधोरेखित करणारा - अभिनेते डॉ. अमोल कोल्हे

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist