पुणे,दि ०४ :- प्रसिध्द मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी बाणेर येथील ‘सुवासिनी’ क्रिएशन्स या वस्त्रदालनास भेट देऊन दिवाळीसाठी साडी खरेदीचा आनंद लुटला !
मालिका,जाहिराती आणि चित्रपटांच्या बिझी शेड्युलमध्ये वेळ काढून त्यांनी आवडीच्या डिझाईनच्या साडया खरेदी केल्या.
दिवाळी हा पारंपारिक सण असल्याने माहिलांना साडी खरेदीची संधी असते. ही संधी साधत ‘ सुवासिनी ‘ येथे प्राजक्ता माळी यांची दिवाळी खरेदी साजरी झाली
त्यांनी हॅण्डलुम,प्युअर येवला पैठणी,उपाडा सिल्क,गढवाल सिल्क,डिझायनर बॉकेट, फॅन्सी डिझायनर,कांजी पुरम सिल्क,कॉटन सिल्क या प्रकारातील साडया पाहिल्या. त्यातील सिलव्हर ब्रॉकेट साडी व खण साडी खरेदी केल्या.’बाणेर मध्ये इतके वैविध्य असलेले वस्त्र दालन पाहून आनंद झाला.मी माझ्या आवडीच्या साड्या तर खरेदी केल्याच पण माझे कुटुंबीय सुद्धा इथे येणार आहेत.’ असे उदगार प्राजक्ता माळी यांनी काढले.
‘सुवासिनी क्रिएशन्स’ च्या वतीने सतीश बाचल,अतुल खुणे,रवी मारगुनी,नितीन बाचल,सचिन खुणे यांनी स्वागत केले