पुणे,दि.०४ :- दिपावली सणाचे निमित्ताने बिबवेवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील तृतीयपंथियांशी बिबवेवाडी पोलीस ठाणेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी संवाद साधून त्यांना एकत्रित करुन बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे एकूण ३२ तृतियपंथियांना बिबवेवाडी पोलीस ठाणेच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांचे तर्फे फराळ वाटप करणेत आले . तसेच सामाजिक कार्यकर्ते रविशेठ दुगड व कुटूंबियांचे वतिने सामाजिक बांधिलकी जपत एकूण ३२ तृतियपंथियांना साडी वाटप करुन रविशेठ दुगड व बिबवेवाडी पोलीस ठाणे यांचे संयुक्त
विद्यमानाने दिवाळी सण मोठ्या आनंदाने साजरा करणेत आला .अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच पोलीस ठाणेस साजरा झालेने तृतीयपंथी चांदणी गोरे , सुधा यांनी आमची अशीच प्रतिष्ठा समाजामध्ये प्रस्थापित व्हावी असे मत मांडून बिबवेवाडी पोलीसांचे तसेच सामाजीक कार्येकर्ते रविशेठ दुगड व कुटूंबीयांचे आभार मानले . सदर कार्यक्रम बिबवेवाडी ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे तसेच पोलीस ठाणेचे इतर अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थित होते.