• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जादुटोनाची भिती दाखवून महीलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबा वाकड पोलीसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/12/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. २८ :- डांगे चौक येथे भोंदुबाबा याने एका महिलेवर जादूटोणा करून त्यांना कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला असता वाकड पोलिसांनी सापळा लावून बीड जिल्ह्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या.विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज (वय 41, रा. मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, विलास पवार उर्फ महाराज याने महिलेला फोन केला. महिलेला कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तिच्या पतीने सांगितले असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले. महिलेच्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्यांचे आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून आरोपीने महिलेका वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे. त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करू शकणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लिल व्हिडिओ पाठवून त्यात उजव्या हातावरील तीळ व गुप्तांगावरचे तीळ दाखवले. व्हीडीओ पाठविल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.तसेच फिर्यादीला माझेशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील. तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करून पीडीत महिलेचा विनयभंग केला.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी फिर्यादी महीलेच्या मदतीने 25 डिसेंबर रोजी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा लावला. आरोपी डांगे चौकात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) संतोष पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक केले . सपोनि अभिजीत जाधव यांनी फिर्यादी महीलेशी संपर्क साधून त्यांचे मदतीने दि .२५ / १२ / २०२१ रोजी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा रचला व सपोनि अभिजीत जाधव , पोलीस अंमलदार सपोफौज कन्हेरकर , पोहवा साबळे व इतर अंमलदार यांनी शिताफिने आरोपीस ताब्यात घेतले . त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले . सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर हे अधिक तपास करीत असून आरोपी नामे विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज , वय ४१ वर्षे , रा . मु.पो. पिंपळवंडी , ता . पाटोदा , जिल्हा बिड याला दि .२८ / १२ / २०२१ रोजी पर्यन्त पोलीस कस्टडीची रिमांड मिळाली आहे . गुन्हयाचा तपास चालु आहे . सदरची कारवाई कृष्णप्रकाश, पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , डॉ संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त , परि २ पिंपरी चिंचवड , श्रीकांत दिसले , सहा.पोलीस आयुक्त वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे , सपोनि अभिजीत जाधव , सपोनि संतोष पाटील , पोउपनि गणेश तोरगल , पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर , दिपक साबळे , दिपक भोसले , भास्कर भारती , कल्पेश पाटील यांनी मिळुन केली आहे .

Previous Post

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मंत्रालयात माहीती आणि आरक्षण केंद्र…

Next Post

अटक वॉरंट रद्द करण्यासाठी लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

अटक वॉरंट रद्द करण्यासाठी लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist