पुणे ग्रामीण,दि.२८ :- घोडेगाव कोर्टातील अटक वॉरंट रद्द करण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. कोंडाजी दामोदर रेंगडे (वय 53) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहे.पुणे ग्रामीण पोलीस दलातील घोडेगाव पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी आहे. सुनावणीसाठी संबंधित व्यक्ती हजर राहत नसल्याने न्यायालयाने तक्रारदार विरुद्ध वॉरंट काढले होते. हे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी कोंडाजी रेंगडे त्यांनी फिर्यादी कडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 2000 रुपयावर हा व्यवहार ठरला होता.दरम्यान संबंधित व्यक्तीने याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली होती. लाचलुचपत विभागाने या प्रकरणाची खातरजमा करून आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्यानुसार आज लाच स्वीकारताना कोंडाजी रेंगडे त्याला रंगेहात पकडण्यात आले.असून घोडेगांव पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . ला.प्र.वि. पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक शीतल घोगरे तपास करत आहेत .सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टी करप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२०-२६१२२१३४ , २६१३२८०२, क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .