पुणे,दि.१७ :- पुणे शहरांतील वाहन चोरी करणाऱ्या तिघांना दि.१५ रोजी गुन्हे शाखा युनिट ४ कडील सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव व स्टाप असे पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे आदेशान्वये चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत पोलिसांनी तिन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या एक दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. १) शिवम ऊर्फ बिहारी राकेश चौधरी, वय २१ वर्षे, रा. डी. पी. रोड, आंबेडकर वस्ती, चष्म्याच्या दुकानाजवळ, औंध, पुणे २) विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे ताब्यातील मोटर सायकल ही त्यांचा साथीदार नामे ३) मोहन अडागळे रा. विधाते वस्ती, औंध पुणे अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.वाहनचोरीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर चतुःश्रृंगी पोलीस हद्दीत गुन्हे शाखा युनिट ४ कडील गस्त घालत होते. या दरम्यान संशयित वाहनचोर हे शाश्वत हॉस्पिटल, डी पी रोड औंध या भागात दुचाकीसह थांबल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत एक दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी सुमारे ०३ महीन्यापुर्वी गणराज चौक बाणेर येथून रात्रीच्या वेळी स्प्लेंडर मोटार सायकलचे हँडेल लॉक तोडून चोरल्याचे व चार गुन्हे कबूल केले. व औंध, डी पी रोडवरील काका हलवाई दुकानाचे पाठीमागील सोसायटी मधुन केटीएम आर सी ३९० जुनी सांगवी शितोळे नगर येथुन केटीएम २००, व बाणेर सुस रोडवरील बिटवाईज कंपनीचे मागील गेटजवळून यामाहा फेजर कंपनीची मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक. विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील व युनिट-४ कडील पोलीस अंमलदार महेंद्र पवार, अजय गायकवाड, हरिष मोरे, सारस साळवी, नागेशसिंग कुँवर, रमेश राठोड, विठ्ठल वाव्हळ, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.