पुणे,दि.१८:- पुण्याचे माजी पोलिस आयुक्त व अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी आज दि १८ (रविवार) सकाळी १० वाजता राज्य कारागृह प्रमुख पदाचा पदभार अप्पर पोलिस महासंचालक रितेश कुमार यांच्याकडून स्विकारला आहे. गृह विभागाने राज्यातील आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये अमिताभ गुप्ता यांनी अप्पर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य या ठिकाणी बदली करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यामध्ये बदल करून अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. शनिवारी बदलीचे आदेश निर्गमित झाल्यानंतर आज अमिताभ गुप्ता यांनी राज्य कारागृह प्रमुख पदाचा पदभार स्विकारला.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख रितेश कुमार यांची पुण्याचे आयुक्त म्हणून नियक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा (महाराष्ट्र राज्य) या पदाचा पदभार रितेश कुमार यांच्याकडे होता. अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह प्रमुख पदी बदली झाल्यानंतर आज सकाळी अमिताभ गुप्ता यांनी रितेश कुमार यांच्याकडून पदाची सुत्रे स्विकारली आहे. राज्य कारागृह विभागाचे प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर एनआयएमध्ये अप्पर महासंचालक म्हणून बदली झाली. तेव्हापासुन हे पद रिक्त होते. त्याचा अतिरिक्त पदभार रितेश कुमार यांच्याकडे होता. आता राज्य कारागृह प्रमुखपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे.