पुणे,दि.२५:- नाताळ निमीत्त यंदाही येरवडा व महाराष्ट्रा कारागृहातील कैद्यांनी (बंदी) घडविलेल्या विविध गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले आहे. कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृह देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारागृह आहे. या कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा झालेले कैदी शिक्षा भोगत असून शिक्षा कालावधीत कैद्यांना कारागृहात वेळ व्यतीत करायचा असतो. कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून त्यांना विविध कलात्मक वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारागृहात सुतारकाम, शिवणकाम, बागकाम, बेकरी उत्पादने तसेच विविध वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी दिवाळी, राखी पौर्णिमा, नाताळ, गणेशोत्सवात कैद्यांनी घडविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित केले जाते. नाताळ निमित्त आयोजित करण्यात आले पुणे रेल्वे स्टेशन येथील मेन इंत्रेट्रांस मधील एक स्थानक एक उत्पादन OSOP केंद्र शासनाची रेल्वे विभागाचे योजनेचा स्टॉल उपलब्ध करून महाराष्ट्र कारागृह उद्योग केंद्राचे विक्री व प्रदर्शन चे उ्घाटन रेल्वे पोलीस व कारागृह अधिकारी/ कर्मचारी /रेल्वे प्रवासी यांच्या उपस्थितीत करण्यात आले व आदी उपस्थित होते.कारागृहात विविध शासकीय कार्यालयांना लागणारी लोखंडी कपाटे, फर्निचर, गणवेश, सतरंजी, फाईल, बेडशीट, टाॅवेल आदी वस्तू तयार केल्या जातात. या वस्तुंचा दर्जा चांगला असल्याने नागरिकांकडून मोठी मागणी असते. पुणे रेल्वे स्टेशन येथील मेन इंत्रेट्रांस मधील एक स्थानक एक उत्पादन OSOP केंद्र शासनाची रेल्वे विभागाचे योजनेचा स्टॉल उपलब्ध करून दिले उद्योग विक्री केंद्रात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक25/12/2022 ते 08/ 01/2023 पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असल्याची माहिती कारागृह शिवशंकर बा पाटील अधीक्षक
येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे 6 प्रशासनाने दिली.