औरंगाबाद दि,१९ ःः- हॉकी चंडीगडने सलग दुसरा विजय साकारणारा स्पर्धेतील दुसरा संघ ठरला. त्यांनी मंगळवारी (19 फेब्रुवारी) हॉकी ओडिशाला नमवुन दणदणीत विजय साकारला. हॉकी ओडिशानेही विजय नोंदवत नेटाने पुढे चाल केली. कनार्टक संघाला खोडक्यात विजयाने हुलकावणी दिल्याने मैदानावर रोचक सामने पहायला मिळाले. अन्य सामन्यांमध्ये मध्यप्रदेश हॉकी अकादमीने पुनरागमन करत स्पर्धेत आपण कायम असल्याचे सिद्ध केले. हॉकी बिहारने स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड (एसपीएसबी) 1-0 ने बाजी मरली.
चंडीगडची विजयी घौडदौड, अ गटात अव्व्ल
हॉकी चंडीगडने आपली विजयी घौडदौड कायम राखत हॅकी हिमाचलला 7-1 च्या फरकाने दणदणीत मात दिली. या विजयासह अ गटात सहा गुणांसह अव्व्ल स्थान पटकावण्यात चंडीगड संघाला यश आले. मंगळवार (19 फेब्रुवारी) च्या पहिल्याच साखळी सामन्यात हरप्रित सिंगने (9 मि., 25 मि.,) सलग गोल करत चंडीगडला आघाडी मिळवुन दिली. त्यपाठोपाठ यशदिप गोयल (19 मि.,) अमनदिपने दोन (28 मि., 57 मि.,) गोल करत संघाला विजयाकडे नेले. यशदिप गोयल (19 मि.,) सुखजित सिंग (38 मि.,) सुखमन सिंग (45 मि.,) यांनी गोल करुन आपली जबाबादारी पार पाडली. सामन्यात 5-0 ने पिछाडीवर असलेल्या हॉकी हिमाचलसाठी वाशू देव (40 मि.,) ने गोल केला. त्यापाठोपाठ चरणिजतने (57 मि.,) गोल करत अंतर कमी करण्यासाठी एकाकी झुंज दिली.
हॉकी कर्नाटक, उत्तरप्रदेश हॉकीची बरोबरी
क गटात झालेल्या सामन्यात हॉकी कर्नाटकने एक गोल जास्तीचा घेत 2-1 नेउ उत्तर प्रदेश हॉकीला मागे टाकले होते. सात्विक एच. आरने 51 व्या मिनीटांत पेनल्ची स्ट्रोकच्या मदतीने गोल ठोकला आणि उत्तर प्रदेशच्या विजयाच्या मनसुबा धूळीस मिळवला. उप्र च्या शारदा तिवारीने 26 व्या मिनीटात 26 व्या मिनीटात गोल करत संघाला आघाडी मिळवुन दिली. तत्पुर्वी अजीत व्ही. एम, शिवम आनंद यांनी गोल करत दणदणीत कर्नाटकासाठी महत्वपुर्ण कामगरी बजावली. असे असले तरी उत्तरप्रदेशच्या गटातील अव्वल स्थानावर कोणताही परिणाम झालेला नाही.
मध्य प्रदेश हॉकी अकदमीचा पहिला विजय
मध्य प्रदेश हॉकी असोसिएशन संघाने मुंबई हॉकी आसोसिएशन संघाला 6-1 ने धूळ चारत ब गटात स्पर्धेतील पहिला विजय साकारला आहे. विकास रजक (4 मि., 43 मि.,) ने दोन गोल केले. युवा ऑलिम्पियन अलिशान (16 मि., 20 मि.) यांनी चार गोल करत मध्यप्रदेशला आघाडी मिळवुन दिली होती. त्याक त्यावर प्रियोबाता तालेम (10 मि.,) आदर्श हर्दुआ (23 मि.,) गोल करत कळस चढवला. मुंबईकडुन मोहित कथोटेने 53 व्या मिनीटात पेनल्टी स्ट्रोकद्वारे एकमेव गोल केला.
कृष्णा तिर्किमुळे हॉकी ओडिशा विजयी
हॉकी ओडिशा संघाचा कर्णधार असलेल्या कृष्णा तिर्कीच्या सहाय्याने हॉकी ओडिशाने पंजाब अण्ड सिंध बॅंकच्या संघाला ड गटाच्या लढतीत 1-0 ने मात दिली. 23 व्या मिनीटात कृष्णाने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने गोल साकारला जो निर्णायक ठरला. आता चार गुणांसह ड गटात हॉकी ओडिशा आव्व्स स्थानावर पोहोचला आहे.
ड गटातीलच सामन्यात हॉकी बिहारने 2-1 च्या फरकाने एसपीएसबीवर विजय मिळवला. हॉकी बिहारला सामन्यात पुढाकार घेण्यासाठी मोठी वाट पहावी लागली. संचित होरोने बिहारसाठी 51 व्या मिनीटात गोलचा सिलसिला सुरु केला. त्यापुर्वी एसपीएसबीच्या रजत मिन्झने 29 व्या मिनीटात गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवुन दिली होती. हाफटाईमध्ये अघाडीवर असलेल्या एसपीएसबीची सचिन डूंगडुंगने 34 व्या मिनीटात बरोबरी साधली होती. संचित सोरोच्या गोलने हा सामना बिहारच्या परड्यात आणुन घातला.
निकाल ः
गट अ ः हॉकी चंडीगड ः 7 (हरप्रित सिंग 9 मि., 25 मि., यशदिप गोयल 19 मि., अमनदिपने दोन 28 मि., 57 मि., सुखजित सिंग 38 मि., सुखमन सिंग 45 मि.) वि. वि. हॉकी हिमाचल ः 2 (वाशू देव 40 मि., चरणजित 54 मि.) हाफ टाईम. 3-0
गट ब ः मध्यप्रदेश हॉकी अकादमी ः 6 (विकास राजक 4 मि., 43 मि., प्रियोबता तालेम 10 मि., आलिशान 16 मि., 20 मि., आदर्श हर्दुआ 23 मि.) वि. वि. मुंबई हॉकी असोसिएशन ः 1 (मोहित काथोटे 53 मि.,).हाफटाईम 5-0
गट क ः उत्तरप्रदेश हॉकी ः 2 (शारदा तिवारी 26 मि., शिवम आनंद 40 मि.) ड्रॉ वि. हॉकी कर्नाटका 2 (अजित व्ही. एम 37 मि.,सात्वीक एच. आर 51 मि.) हाफ टाईम 1-0
गट ड ः हॉकी ओडिशा ः 1 (कृष्णा तिर्की 23 मि.,) वि. वि. पंजब ऍण्ड सिंध बॅंक ः 0 हाफ टाईम 1-0
गट ड ः हॉकी बिहार ः (सचिन डूंगडुंग 34 मि., संचित होरो 51 मि.,) वि. वि. एसपीएसबी ः (रजत मिन्झ ः 29 मि.) हाफटाईम 0-1
बुधवारचे सामने ः
गट अ ः हॉकी पंजाब वि. हॉकी चंडीगड – (सकाळी सात)
गट अ ः सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) वि. हॉकी युनीट ऑफ तामिळवनाडू – (सकाळा साडेआठ)
गट ब ः हॉकी हरियाणा वि. मध्यप्रदेश हॉकी अकादमी (सकाळी दहा)
गट ब ः हॉकी झारखंड वि. मणिपुर हॉकी (सकाळी साडेअकरा)
गट क ः हॉकी गंगपूर ओडिशा वि. उत्तरप्रदेश हॉकी (दुपारी एक)
गट क ः हॉकी महाराष्ट्र वि. दिल्ली हॉकी (दुपारी अडिच)
गट ड ः भारतीय खेळ प्राधिकरण वि. हॉकी बिहार (सायंकाळी चार)