पुणे,दि.०२:- पुणे शहर पोलीस आयुक्त. रितेश कुमार, यांनी शहराचा पोलीस आयुक्त, कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करून संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले होते व आज दि.०२ रोजी पुणे शहरातील गुन्हेगार वर
खंडणीसह गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार 14. तडीपार, 5 ‘मोक्का’. 1 एमपीडीए, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांना दणका दिला आहे.
खंडणी व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या उमेश मुकेश वाघमारे व त्याच्या ५ साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 9 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.टोळी प्रमुख
१)उमेश मुकेश वाघमारे (वय-24)
२)मंदार संजय खंडागळे (वय-21), ३)आदित्य लक्ष्मण बनसोडे उर्फ भुंड्या (वय-19)
४)गणेश मारुती शिकदार (वय-19), ५)विनायक उर्फ नंदु सुनिल शिंदे (वय-22)
व एक पाहिजे आरोपीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत म्हणजे मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी उमेश वाघमारे व त्याच्या इतर साथीदारांनी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 नोव्हेंबर 2022 रोजी एका व्यक्तीकडे खंडणीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील हत्यारे उंचावुन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.खकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला होता. प्राप्त प्रस्तावाची आणि कागदपत्रांची पडताळणी करुन मोक्का कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे,
सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव,पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली,
समर्थ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत केलेली ही तिसरी कारवाई आहे. व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या तसेच दहशत माजवून संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
१)सागर भुजंग नायडू (वय-27 रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, पालघन, लोखंडी रॉड, लाकडे दांडके, बॅट या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न , जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती.आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला
एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध
करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी केली,
परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, लोणीकंद आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तब्बल १४ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.०२) करण्यात आली आहे. एकाच दिवशी १४ गुन्हेगारांना तडीपार केल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे.
परिमंडळ चार मधील पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, महिलांवरील अत्याचार बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अवैध जुगार अड्डा चालविणे, अवैध दारु विक्री करणे, अंमली पदार्थाची विक्री, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते.
तडीपारीच्या प्रस्तवाची पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांनी चौकशी करुन १४ गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे कारवाई केली आहे. १४ गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील
१) मनोज भगवान कांबळे, वय ४८ वर्षे, रा. स.नं.८ यशवंतनगर येरवडा पुणे, २) ईस्माईल रियाज शेख वय २२ वर्षे रा. गल्ली नं १५ राजीव गांधी नगर झोपडपट्टी येरवडा पुणे, ३) देवीबाई रमेश राठोड, वय ४५ वर्षे, रा. नाईकनगर येरवडा पुणे. ४) सुमन मोहन नाईक वय ५० रा. स.नं. १४नाईक नगर येरवडा पुणे, ५) भारती कृष्णा चव्हाण वय ३२ रा. स.नं. १४ नाईक नगर येरवडा पुणे. ६) कमल राजु चव्हाण वय ५० रा. स.नं. १४ नाईक नगर येरवडा पुणे ७) लक्ष्मी गोपाळ पवार वय ४६ वर्षे, रा. स.नं. १४ नाईक नगर येरवडा पुणे ८)मोहित ऊर्फ बिटया संजय सुर्यवंशी वय २३ रा.स.नं.१९१ नागपुर चाळ येरवडा पुणे
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील
९)सुरज ऊर्फ गुंडया मनोहर माचरेकर वय ४० रा. भिमनगर विश्रांतवाडी पुणे, १०) दिलीप गोविंद सुर्यवंशी वय ३१ वर्षे, रा. काशीद चाळ कळस विश्रांतवाडी पुणे, ११) विवेक चंद्रकांत चव्हाण वय २७ वर्षे रा. बौध्द विहारा जवळ भारतनगर येरवडा पुणे, खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील १२) गौरव दिपक मिसाळ वय २१ वर्षे रा. घर नं ६९ इंदिरानगर वसाहत खडकी पुणे, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील १३ ) नगनाथ संभाजी गिरी वय १९ वर्षे रा. दुर्गामाता मंदिरा जवळ खराडी पुणे,
चतुश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील
१४) जावेद जानशा शेख वय ५३ वर्षे रा.मंजाळकर चौक वडारवाडी पुणे
असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.