पुणे दि.०२ :- भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २१५ कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ घोषित झाली असून मतदारांनी आपली व आपल्या कुटुंबियांची मतदार यादीतील नोंद ऑनलाईन पद्धतीने तपासून घ्यावी, असे आवाहन कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.
मतदारांनी nvsp.in या संकेतस्थळावर ‘वोटर सर्च’ या पर्यायाचा वापर करावा. ८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता मतदारांना ‘नमुना १२ डी’ हा अर्ज आपले कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत वाटप करणेत येत आहेत. टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मतदारांनी सदर अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे तात्काळ भरून द्यावेत.