औसा.दि २०:- औसा तालुक्यातील चिंचोली तपसे येथे ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तसेच जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड . हल्ल्यातील सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाउपाध्यक्ष तथा औसा तालुका काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष मा शेषेरावजी पाटील हे होते,अध्यक्षांच्या हस्ते यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी पाटील यांनी शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला, व पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला. “असे भ्याड हल्ले खपूवन घेतले जाणार नाहीत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. त्यासाठी माझ्या गावातील प्रत्येक घराघरांतून जवान त्या पाकड्याला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवान पाठवू” असे म्हणाले.
यावेळी बालाजी बिराजदार,राजकुमार शिंदे,शाहूराज यादव,व्यंकट शिंदे, विष्णू गरड,दत्तात्रय मुळे उपस्थित होते
तसेच गावातील सर्व शिवसैनिक व बहुजन समाजानेही सहभाग नोंदवला होता.
सायंकाळी पाच वाजता शिवरायांच्या प्रतिमेची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील सर्व तरुण मंडळी सहभागी झाली होती.