औरंगाबाद दि,२० :- नवव्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या नॉकआउट फेरीत पोचण्याचा पहिला मान हरियाणा संघाने पटकावाला आहे. दुसरीकडे हॉकी महाराष्ट्राला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून दिल्ली हॉकीने महाराष्ट्राला नमवले. हॉकी पंजाब, हॉकी चंदीगड संघांनी ताकद दाखवत आपापले सामने बरोबरीत सोडवले.
भारतीय खेळ प्राधिकारांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी (२० फेब्रुवारी) तामिळनाडू हॉकी युनिट आणि मणिपूर हॉकीने आपले सामने जिंकून स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यांनी अनुक्रमाने सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) आणि हॉकी हरवण्याचा पराक्रम केला.
साई ने नोंदवला पहिला विजय
ड गटातील सामन्यात भारतीय खेळ प्राधिकरण संघाने हॉकी बिहारला २-१ ने हरवून आपला स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. मनीष यादव आणि दिलीप पालने सातव्या आणि ४४ वव्य मिनिटात साई संघासाठी गोल केले तर बिहारकडून ५४ व्या मिनिटाला साजन कडून एक गोल झाला. साईने ४ गुणांसह गटात हॉकी ओडिशासह गुणांकन यादीत स्थान मिळवले आहे.
क गटात दिल्लीचे वर्चस्व
की गटात झालेल्या सामन्यात दिल्ली हॉकीने हॉकी महाराष्ट्राला हरवून द गटात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या सामन्यात महाराष्ट्राला १-० ने पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीच्या प्रशांतने २२ व्य मिनिटात केलेल्या गोळीने सामन्याचा निकाल लावला. या विजयासह दिल्ली ड गटात ७ गुणांसह अव्वल्ठणी पोचली आहे. तर महाराष्ट्राचा चमू शून्य गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
संघातील खेळाडू शहाबाज खानच्या पुढाकाराने आलेल्या गोलच्या साथीने उत्तरप्रदेश संघाने गंगपूर ओडिशा विरुद्ध गमावलेला सामना २-२ च्या बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. त्याने ५९ व्य मिनटात गोल करून संघाला पराभवापासून वाचवले. त्यांच्या तर्फे उत्तमसिंगने आठव्या मिनिटात एक गोल केला. तत्पूर्वी सुदीप चीरमाको, तेते अल्बर्ट यांनी ४४ आणि २४ व्य मिनिटात गोल करून गंगपूर ओडिशासाठी आपले योगदान दिले. आता हे दोन्ही संघ आपल्या गटात ५-५ गुणांसह बरोबरीत आले आहेत.
ब गटावर हॉकी हरियाणा, मणिपूरचे वर्चस्व
या गटातून नॉक आउट फेरीतील पहिला स्पर्धक संघ हॉकी हरयाणाच्या रूपाने पुढे आला. त्यांनी मध्यप्रदेश हॉकी अकादमीला २-१ च्या फरकाने हरवून स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. हरियानाकडून रिमांशू (४२ मि.) आणि पंकज (५३ मि) यांनी गोल करून संघासाठी निर्णायक आघाडी घेऊन टाकली. त्यांनी मध्यप्रदेश हॉकी अकादमीला आठव्या मिनिटात आलिशान कडून आलेल्या गोलच्या आधारे पटकावलेली आघाडी कापून विजयी आगेकूच केली.
याच गटात मणिपूर हॉकी हॉकी झारखंडला ५-० ने मागे टाकत सामना पटकावला. पेनल्टी कॉर्नरच्या रूपाने रबीचंद्र मोइरांगथेमने तर रिकी तोंजामने केलेल्या दोन गोळीच्या आधारावर मणिपूरच्या हा सामना एकहाती जिंकला. त्यामध्ये रोहित इरेंगबामने एक गोलचे योगदान दिले.
हॉकी चंदीगड लटपटली, तामिळनाडूचा सहज विजय
हॉकी चंदीगड आणि तामिळनाडूचा हॉकी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघांना नमवत अ गटातील पहिले आणि दुसरे स्थान काबीज केले आहे. तामिळनाडू संघाने सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या संघाला ४-१ च्या फरकाने नमवून विजय साकारला. एसएससीबी संघाला मनजीत (८ मि) ने आघाडी मिळवून दिल्यावर तामिळनाडूच्या चमूने सलग चार गोल झोडले आणि अवघ्या ५ मिनिटात महाकाय आघाडी घेऊन टाकली. एम. सेंथिल कुमार (२९ मि) ने बरोबरी साधली तर के तिरसने ३० आणि ३२ व्या मिनिटात गोल करत आघाडी कमवाली. आणि ३३व्य मिनटात एस. कार्थीने गोल करून निर्णायक आघाडी कायम केली होती. करतही ६ गोलसह या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
हॉकी पंजाबला विजयापासून रोखत हॉकी चंदीगडने हा सामना २-२ ने ड्रॉ ठरवला. चंदीगडच्या हाशिमने ५९ व्य मिनटात पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये परिवर्तन करून सामना बरोबरीत आणला. त्यापूर्वी जसप्रीत सिंगने पाचव्या तर नंतर सुदर्शन सिंगने ५४ व्या मिनिटात गोल करून आघाडी घेतली. या आघाडीला बरोबरीत रूपांतरित करण्याचे काम चंदीगडच्या अर्शदीपने केले.
निकाल :
गट अ : तामीळनाडूचा हॉकी संघ : ४ (एम सेंथिल कुमार २९ मि. के तीरस ३०, ३२ मि., एस. कार्थी ३३ मि.) वि. वि सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड : १(मनजीत ८मि.)
गट ब : हॉकी हरियाणा : २ ( रिमांशू ४२ मि., पंकज ५३ मि.) वि. वि मध्यप्रदेश हॉकी अकादमी : १ (अलिशान ८ मि.) हाफ टाईम ०-०
मणिपूर हॉकी: 5 (रबीचंद्र मोइरांगथेम २७, ३४ मि , रिकी तोंजाम ३९, ४४,मि., रोहित ४८ मि) वि. वि हॉकी झारखंड : ० हाफ टाईम ०-१
क गट : हॉकी गंगपूर ओडिशा : २ (तेते अल्बर्ट २४ मि, सुदीप चिरमाको ४४ मि.) ड्रॉ वि उत्तरप्रदेश हॉकी: 2 (उत्तम सिंग ८ मि, शाहबाझ खान ५९मि)
दिल्ली हॉकी : १ (प्रशांत २२ मि) विवि हॉकी महाराष्ट्र : ० हाफ टाईम १-०
ड गट : साई:2 ( मनीष यादव ७ मि, दिलीप पाल ४४ मि) विवि हॉकी बिहार : १ (साजन सिंग ५४ मि) हाफ टाईम १-०
गुरुवारचे सामने
गट अ : एसएससीबी वि. हॉकी हिमाचल (सकाळी साडेआठ)
गट ब : हॉकी झारखंड वि. द मुंबई हॉकी असोसिएशन (सकाळी दहा)
गट क : हॉकी महाराष्ट्र वि. हॉकी कर्नाटक (सकाळी साडेअकरा)
गट ड : हॉकी ओडिशा वि साई (दुपारी अडीच)
गट ड : पंजाब अँड सिंग बँक लिमिटेड वि. स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड (सायंकाळी चार)