पुणे,दि.१६:- पुणे शहरातील उंड्री परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने दोन अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण नियंत्रण विभाग व बांधकाम विभाग यांनी कारवाई करण्यात आली. आज ही मोहीम तीव्र करत अनधिकृत इमारतींवर मोठ्या फौजफाट्यासह जबर दणका दिला.यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी उंड्री (ता. हवेली) येथील स.नं. ५१ आणि स.नं. ५९ मधील अनधिकृत पाच मजली दोन इमारतीवर जाँ कटरच्या सहाय्याने सुमारे ३० हजार चौरस फूट अनधिकृत क्षेत्र बांधकाम विकास विभाग झोन- १च्या वतीने मोकळे करण्यात आले.
पाच मजली दोन इमारतीवर जाँ कटरच्या सहाय्याने सुमारे ३० हजार चौरस फूट अनधिकृत क्षेत्र बांधकाम विकास विभाग झोन- १च्या वतीने मोकळे करण्यात आले.जेसीबीने पाडण्यात आले.फौजफाटा आणि प्रशासनाचा ‘मूड’ पाहून कारवाईला कोणीही विरोध केला नाही. ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख व कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता गोपाळ भंडारी, कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार आणि पोलीस निरीक्षक राजू अडागाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.सदर कारवाई दहा बिगारी, एक जेसीबी, दोन ब्रेकर आणि एक जॉ कटरच्या साहाय्याने पूर्ण करून दोन्ही इमारती पाडल्या. व कारवाईत
कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभाग तसेच कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता