पुणे,दि.१६ :- पौड परिसरातील एका 9 वर्षाच्या चिमुकलीवर वारंवार आत्यचार करणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्धाला पौड पोलीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या.पुण्याच्या मुळशी तालुक्यात ही धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
आरोपी हा एकाच गावातील असल्याने त्याची पीडित कुटुंबाशी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत तो मुलीच्या शाळेत जायचा आणि तिच्या शिक्षिकेला तिच्याकडे काम आहे सांगून तिला स्वतःच्या घरी घेऊन घ्यायचा. मग तिच्यावर अत्याचार करायचा. याबाबत कुठे वाच्छता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा.
पीडित मुलीचे वडिलांना दारुचे व्यसन असल्याने तिची आई सात वर्षापूर्वी घर सोडून निघून गेली आहे. मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह काका-काकू आणि आजोबांसोबत राहते. मंगळवारी मुलीच्या नात्यातील भावाच्या मोबाईलवर आरोपी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आला. त्याने तो मुलीच्या आजोबांना दाखवला. व्हिडिओवरुन ही आपलीच नात असल्याची खात्री पटताच आजोबांनी मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारले असता मुलीने सर्व सांगितले.
आरोपीला अटक
यानंतर मुलीच्या आजोबांनी पौड पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला. पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरुन पौड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.पुढिल तपास डी. वाय. एस. पी. ढोले पाटील करीत आहे