पुणे,दि.०३ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि. १ मे २०२३ रोजी विक्रम कुमार, प्रशासक तथा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विक्रम कुमार, प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीष्टीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतीबा फुले यांचे यांचे पूर्णाकृती पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विक्रम कुमार, प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी .अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे , नगरसचिव शिवाजी दौंडकर,तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.