पुणे,दि.०३:- पुणे शहरातील काही पंचताराकीत हॉटेल येथे दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा ठिकाणांवरुन पिडीत महिलांना बोलावुन ग्राहकाशी ऑनलाईन संपर्क करुन पुण्यातील पंचताराकीत हॉटेल येथे पाठवुन हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा.पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने, पर्दाफाश केला आहेपोलिसांनी या ठिकाणाहून चार तरुणींची सुटका केली तर काही दलालांना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणी दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील आहेत. तर सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तीन दलालांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील काही पंचतारांकित हॉटेल मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गोपनीय माहिती पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. परराज्यातील तरुणींना या हॉटेलमध्ये खोली बुक करून देऊन आरोपी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घ्यायचे. ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने सर्व व्यवहार करत होते. ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांना मिळाली.
दरम्यान वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने यातील दलालाशी संपर्क साधला. आणि त्यानंतर हॉटेल परिसरातच सापळा रचला. आरोपींनी आधीच या हॉटेलमध्ये दोन रुम बुक करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी या तरुणींना बोलवण्यात आले. आणि त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी या दोन्ही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी दोन तरुणी यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या दोन तरुणी आणि तीन दलालांना येरवडा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, इम्रान नदाफ, इरफान पठाण, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.