पुणे,दि.०९:- पुण्यातील हडपसर रोड येथील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना पोलिसांच्या पथकाला ही रक्कम मिळाली.या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे शहर पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांना नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमध्ये सापडल्या. सोमवारी मध्यरात्री ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांची ही रक्कम पुणे शहर पोलिसांना मिळाली. या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीन मिळाले.पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाची मोठी कारवाई हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.प्रशांत धनपाल गांधी नामक एका व्यक्तीला ही ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा वाहतूक शाखा आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावरून गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एका चार चाकी कार मध्ये लाख रुपयांची रोख येणार आहे. त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता वाहनात असलेल्या काही बॅगेत तब्बल 3 कोटी 42 लाख 66 हजार रुपये मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही रोख रक्कम आणि ही गाडी हडपसर पोलीस स्टेशन येथे आणली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रशांत गांधी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम त्याला कर्जापोटी भरायची आहे असे त्याने सांगितले. पोलीस अधिक तपास करत आहेत.