पुणे,दि.०८:- पुण्यातील एका
शाळेची फी न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला देत नसल्याने मदत करण्याच्या बहाण्याने महिलेकडून तब्बल 91 हजार रूपये लुबाडुण तिची फसवणूक करत तिने दाखल्याबाबत विचारणा केली असता तिचा विनयभंग करणार्या एका युट्युबचा पत्रकाराला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हनुमंत राजकुमार सुरवसे (रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुरवसे याचे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज नेटवर्क नावाने युट्युब चॅनेल आहे. त्यांची लोणी काळभोर परिसरामध्ये ओळख आहे. दरम्यान एका महिलेच्या मुलाची कोरोना काळात फी भरली गेली नाही. घरची परिस्थिती नसल्याने महिलेनी सुरवसे याच्याशी संपर्क साधला. त्याने महिलेला मुलाचे दाखले मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने आपली शाळेत चांगली ओळख असल्याचे सांगितले. एक लाखात तुम्हाला तुमचे दाखले काढून देतो म्हणून त्याने तब्बल 91 लाख रूपये महिलेकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात स्विकारले. परंतु, कोणतेही दाखले काढून दिले नाही. महिलेनी त्याला दाखल्याबाबत विचारणा केली असता मी पत्रकार आहे, तु माझ्या विरोधात पोलिसात तक्रार करणार का ?, माझे कोणही काही करू शकणार नाही, पैशाबाबत कुणाला काही बोललीस तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केलचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी महिलेनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, उपनिरीक्षक वैभव मोरे, अमंलार संतोष राठोड यांच्या पथकाने त्याला अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक हंबीर करत आहे.