पिंपरी चिंचवड,दि.२२:- पिंपरी चिंचवड हद्दीतील चिखली परिसरात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिखली चौकात उभ्या असलेल्या एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे चिखली परिसरात प्रचंड खळबळ उडाली खुन झालेल्या इसम
सोन्या तापकीर वय 21 याच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मृत झाला असल्याचे माहिती समोर आली आहे. पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.मारेकर्यांनी गोळीबार करून पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली असून चिखली पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
गोळीबाराचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
आशा घटनेमुळे प्रशासनावर प्रश्न निर्माण होतच असून बंदूक आणि कोयत्याचे वाढते साम्राज्य यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मोठी समस्या निर्माण झाली आहे.