पुणे ग्रामीण,दि.१७ :- पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, पुणे ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत शिरुर, बारामती मावळ असे तीन लोकसभा मतदारसंघ असून ३ हजार १०२ मतदान केंद्र आहेत. याकरीता लागणारे पुरेसे मनुष्यबळ असून बारामती व शिरुर लोकसभा निवडणुकीच्याकरीता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या मतदासंघात ५ संवदेनशील मतदान केंद्र आहेत. जानेवारीपासून २२ अवैध शस्त्रधारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आराखडा तयार करण्यात आला असून विविध गुन्ह्याअंतर्गत असलेल्या आरोपी तसेच अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीकरीता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दल सज्ज असून निवडणुक अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.