पिंपरी चिंचवड,दि.१७:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त चौबे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १ हजार ८५४ मतदान केंद्र असून त्यात प्रामुख्याने मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने १ डिसेंबर २०२३ पासून आतार्यंत २ हजार ५०० पेक्षा अधिक आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीएअंतर्गत १३, मोक्का कायद्याअंतर्गत १८ संघटनेवर कारवाई करुन ९९ आरोपींना अटक, तसेच ९५ आरोपींना हद्दपार, शस्त्र जमा करणे अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. यापुढेही आदर्श आचारसंहितेचे अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे, असेही चौबे म्हणाले.