पुणे,दि.14 :- 3 दुचाकी व लॅपटॉप चोरणाऱ्या चोर कोथरूड पोलिसांच्या जाळ्यात.
पोलिसांनी चोरांनकडून 3 दुचाकी व एक लॅपटॉप असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चोरांनकडून 4 गुन्हा उघडकीस आला आहे.
अमित सुभाष मोरे, वय ३१ वर्षे, रा. विश्वशांती चौक, केळेवाडी, पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.
पुणे शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोथरूड पोलीस ठाण्यातील तपास पथक दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पो.ना. ज्ञानेश्वर मुळे, व पो.शि.तेजस चोपडे, पो.शि. आकाश वाल्मिकी यांना मिळालेल्या माहिती मिळाली की, सीसीटीव्ही मध्ये दिसणारा मोरे, हा केळेवाडी राहत आहे.
त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक चौकशी करुन आरोपीकडून् 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केल्या. आरोपीकडून कोथरूड पोलीस ठाण्य हद्दीतील आणि पाँड पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने चोरलेल्या दुचाकी व लॅपटॉप विकून मिळणाऱ्या पैशातून मौजमजा करता यावी यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
तसेच तपास पथकाने मोरे यांना अटक करुन
त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीचे गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंग कदम, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी बालाजी सानप व पथकातील अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, आकाश वाल्मिकी, संजय दहिभाते, शरद राऊत, विष्णु राठोड, अजय शिर्के, मंगेश शेळके यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.