पिंपरी चिंचवड ,दि.०३:- झुंजार ,ऑनलाइन – आकुर्डी येथील खंडोबा माळ परिसरात वाहन चालकांना पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून पिस्टल, दोन कोयते व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना २१ मे रोजी आकुर्डी येथील खंडोबा माळ येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आकाश मनोज लोट (वय-२२ रा. मोशी), सनी उर्फ अशुतोष अशोक परदेशी उर्फ रोकडे (वय-२४ रा. पाटीलनगर, चिखली), अनिकेत गौतम शिंदे (वय-२४ रा. पाटीलनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्य़ादी व त्याचा मित्र २१ मे रोजी रात्री पिकअप गाडीमधून हडपसर येथून तळेगाव दाभाडे येथे माल सोडवण्यासाठी जात होते. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौकात रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन तीन जण फिर्य़ादी यांच्याजवळ आले. त्यांनी पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून सात हजार रुपये लुटून नेले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी खेड शिवापूर परिसरात निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लोखंडी पिस्टल, २ मोबाईल, २ लोखंडी कोयते आणि गुन्ह्यात वापरलेली एक बुलेट असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आकाश लोट याच्यावर -२, सनी परदेशी याच्यावर -७, अनिकेत शिंदे याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. सनी परदेशी हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त राजु मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक गुन्हे तेजस्वीनी कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, सुधाकर आवताडे, राहुल गायकवाड, विनोद व्होनमाने, भुपेंद्र चौधरी, सिद्राम बाब, तुषार गेंगजे, प्रवीण बांबळे, विनायक मराठे, सुनिल पवार, केशव चेपटे, तसेच सीसीटीव्ही कंट्रोल रुम येथील महिला पोलीस शिपाई स्वप्नानी म्हसकर, सारीका अंकुश यांच्या पथकाने केली