पुणे,दि.१२:- पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक गुरुवारी (दि.12) पुन्हा एकदा ब्लॅक घेण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक उर्से टोलनाका येथे थांबवण्यात येणार असून अवजड वाहतूक वगळता इतर वाहनांनी पर्यायी मार्गाची वापर करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर गुरुवारी एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबई-पुणे महामार्गावर दोन तासाचा ब्लॉक घेतला होता. आता मुंबईच्या लेनवर बोरघाटात किलोमीटर 45/600 आणि किलोमीटर 41/500 या ठिकणी ओव्हर ग्रँटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी दुपारी 12 ते 1 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक दरम्यान पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने उर्से टोलनाका येथे थांबविण्यात येणार आहेत. उर्से टोल नाका येथे अवजड वाहतूक थांबवण्यात येणार आहेत. तर इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे.