पुणे,दि.११:- पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्या हद्दीतील औंध येथील विधाते वस्ती येथील एका व्यक्तीला अटक करुन त्याच्याकडून 46 राऊंड (बुलेट) जप्त केल्या आहेत. ही कारवाई औंध येथील विधाते वस्ती येथे करण्यात आल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीकडे बंदुकीच्या गोळ्या असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अशोक लहू पवार (वय-39 रा. दत्त नगर, विधाते वस्ती, औंध) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी करुन घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घरामध्ये 46 राऊंड (बुलेट) पोलिसांना सापडल्या. या बुलेटवर व 61 व 7 असे लिहिले आहे.
पोलिसांनी आरोपी अशोक पवार याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हे राऊंड त्याच्या ओळखीचा पेस्ट कंट्रोल
करणारा सुदर्शन संजय खंडागळे (वय-38 रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याने
चार ते पाच वर्षापूर्वी ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. अशोक पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत.